पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन-पाकिस्तान ट्रेड कॉरिडोरला स्थानिकांचा तीव्र विरोध
(Archived images)

पाकव्याप्त काश्मीरमधून (POK) गिलगिट बाल्टीस्तान प्रदेशातून जात असलेल्या चीन पाकिस्तान इकनॉमिक कॉरिडोरला (CPEC)स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या कॉरिडॉरला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी हा कॉरिडॉर म्हणजे एक लष्करी प्रकल्प असल्याचे म्हटले आहे. स्थानिकांनी आरोप केला आहे की, या प्रदेशातून विकासच्या नावाखाली राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महत्त्वाचे असे की, या प्रदेशात चीन-पाकिस्तानकडून उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पाला भारताने यापूर्वीच विरध दर्शवला आहे आणि तो सातत्याने कायमही ठेवला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पाकव्याकप्त काश्मीरच्या विविध प्रदेशातील आंदोलकांनी वाघ जिल्ह्यात एकत्र येत आंदोलन केले. पाकिस्तानने आमच्या प्रदेशावर जबरदस्तीने ताबा मिळवला आहे. पाकिस्तानने या प्रदेशावरील ताबा त्वरीत सोडावा अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे. हे आंदोलन युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी (UJPNP)च्या दोन दिवसीय अधिवेशनादरम्यान झाले. या प्रदेशात उभय देशाकडून उभारल्या जाणाऱ्या रस्ते, धरणं आणि इतर प्रकल्पांना विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिक नागरिकांना येथून हूसकून लावण्याचा दोन्ही देशांचा डाव असल्याचा आरोप येथील नागरिक करतात.

कोट्यवधी डॉलर खर्च करुन गिरगिट बाल्टीस्तान प्रदेशातून जात अललेल्या चीन पाकिस्तान इकनॉमिक कॉरिडोरलाही ( CPEC) स्थानिकांनी विरोध केला आहे. UKPNP परराष्ट्र मंत्रालयाचे माजी केंद्रीय सचीव जमी मकसूद यांनी म्हटले आहे की, त्यांची संघटना ही इतर प्रदेशातील राजकीय ताकदीसोबत आंतरराष्ट्रीय फोरमची मागणी करत आहे. सीपीईसीच्या मदतीने पाकिस्तानकडून निर्माण केले जात असलेलेक भीतीचे वातावरण संपवीण्यासाठी मदत केली जावी. (हेही वाचा, चीन-पाकिस्तान बससेवा सुरु करण्याचे उभय देशांचे प्रयत्न; भारताचा ठाम विरोध)

दरम्यान, भारताने सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. चान-पाकिस्तानच्या या प्रकल्पाकडे वरवर पाहता दोन्ही देशांमध्ये दळणवळण व्यवस्था सुरु करण्याचा हा केवळ बहाणा असला तरी, भारताविरुद्ध एक ताकद उभा करणे हाच या दोन्ही देशांचा त्यामागचा उद्देश असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासकांनी दिला आहे. हा इशारा गांभीर्याने घेत भारतानेही उभय देशांच्या या प्रयत्नाला जोरदार विरोध दर्शवला आहे. ही बस काश्मीरमधून पाकिस्तानात जाणार असल्याचे समजते.