200,500 आणि 2000 रुपयाच्या भारतीय नोटांना नेपाळमध्ये चलनात मान्यता मिळावी यासाठी RBI कडे The Nepal Rastra Bank ची पत्राद्वारा मागणी
Rs 500 Notes (File Photo)

नेपाळने भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे (Reserve Bank of India)  100 रूपये आणि त्याहून अधिक मूल्यांच्या भारतीय नोटांना चलनात अधिकृत मान्यता मिळावी याकरिता नेपाळ राष्ट्रीय बॅंकेने (The Nepal Rastra Bank ) मागणी केली आहे. 'द हिमालयन टाईम्स'ने दिलेल्या बातमीनुसार, नेपाळ राष्ट्रीय बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेकडे 200,500 आणि 2000 या नव्या नोटांनादेखील मान्यता मिळावी म्हणून आरबीआयकडे Foreign Exchange Management Act च्या अंतर्गत मान्यता मिळावी अशी मागणी केली आहे.

नेपाळमध्ये सध्या 100 रूपये आणि त्याहून कमी मूल्याच्या नोटा चलनात आहेत. आरबीआय केवळ याच नेपाळी नोटांना रूपयांच्या बदल्यात स्विकारते. 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारतामध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला. फेमाच्या अधिसूचनेनुसार, नेपाळी नागरिकांना 25 हजार मूल्यांच्या भारतीय नोटा ठेवण्यास अनुमती देण्यात आली होती. भारतामध्ये 200,500,2000च्या नव्या नोटा आल्या परंतू त्याच्यासाठी फेमा अंतर्गत अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही.या नोटा नेपाळमध्ये वैध नाहीत.

भारतामध्ये सतत ये-जा करणार्‍या नेपाळी प्रवाशांना व्यवहार करताना त्रास हित असल्याची तक्रार अनेकदा करण्यात आली आहे. या प्रवाशांच्या मागणीवरून आणि तक्रारीवरून ही विचारणा करण्यात आल्याचे नेपाळ बॅंकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.