व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे ही नवीन फीचर्स; आता बदलून जाईल चॅट करण्याची पद्धत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

फेसबुक भलेही वापरकर्त्यांचा डेटा लिक सारख्या कारणांमुळे वाद विवादांमध्ये अडकला असेल, मात्र फेसबुकचे मेसेजिंग अॅप WhatsAppला याचा काहीच फरक पडला नाही. वापरकर्त्यांना सतत काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न असलेल्या WhatsAppने आतापर्यंत अनेक युनिक फीचर्स अॅड केले आहेत. म्हणूनच फक्त शब्दांद्वारेच नाही तर इतर अनेक प्रकारे एकमेकांशी कनेक्टेड राहावे यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणे हे WhatsAppचे वैशिष्ठ्य ठरले आहे. आत्ताही आपले हे अॅप अजून युजर फ्रेंडली बनवण्यासाठी WhatsAap आपली कंबर कसत आहे. म्हणूनच आता जे नवीन फीचर्स WhatsAapमध्ये जोडले जातील यामुळे चॅट करण्याची पूर्ण पद्धतच बदलणार आहे. चला तर जाणून घेऊया WhatsAapमध्ये अॅड केल्या जाणाऱ्या इतर महत्वाच्या फीचर्सबद्दल.

> व्हेकेशन मोड

सध्या या फिचरवर काम चालू आहे. तुम्ही सुट्टीचा आनंद घेत असताना व्यत्यय नको म्हणून, नवीन ‘व्हेकेशन मोड’मध्ये म्यूटवर टाकल्यास येणारे नवीन मेसेजेस अर्काइव्हसमध्ये सेव्ह केले जातील. त्यानंतर जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही हे संग्रहित मेसेजेस वाचू शकता.

> सायलेंट मोड

हे फिचर काही फोन्समध्ये दिसण्यास सुरुवात झाली आहे. या फिचरमुळे तुमचे नोटिफिकेशन्स हाईड केले जातील. हे फिचर व्हेकेशन मोडप्रमाणे कार्य करेल. सुट्टीवर असताना अथवा कामात व्यस्त असताना नोटिफिकेशन्स त्रास होऊ नये म्हणून या फिचरचा फायदा होऊ शकतो.

> लिंक्ड (Linked) अकाउंट्स

या फिचरद्वारे तुम्ही WhatsAapला इतर सेवांशी जोडू शकता. म्हणजेच तुम्ही तुमचेWhatsAap तुमच्या Instaशी जोडू शकता.

> Swipe to Reply

या फिचरमुळे वापरकर्ते फक्त उजव्या बाजूला swipe करून मेसेजेस ना उत्तरे देऊ शकतात. आयफोनमध्ये हे फिचर उपलब्ध झाले आहे.

> PiP मोड

या फिचरमुळे वापरकर्ते व्हिडीओ पाहताना अथवा व्हिडीओ चॅट करताना एका छोट्या बॉक्समध्ये कंटेंटदेखील पाहू शकतात.

> डिलीट मेसेजेस 

पाठवलेले मेसेजेस डिलीट करण्यासाठी सध्या WhatsAapमध्ये 1 तासांचा कालावधी देण्यात आला आहे , मात्र आता हा कालावधी वाढवून 13 तासांचा करण्यात येणार आहे.

> नाईट मोड 

याही फिचरवर सध्या काम चालू आहे. या फिचरमुळे रात्री तुम्ही एका वेगळ्या लाईटमध्ये WhatsAap वापरू शकता. डोळ्यांना त्रास होऊ नये, अथवा ताण येऊ नये म्हणून हे फिचर देण्यात येणार आहे.