आता फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवणे होणार शक्य; तीनही Apps चे होत आहे विलीनीकरण
Mark Zuckerberg (File photo)

सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात घडत असलेली क्रांती थक्क करणारी आहे. फेसबुक (Facebook)ने व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि इन्स्टाग्राम (Instagram) ची मालकी घेतल्यानंतर तर या तीनही सोशल नेटवर्क्सवर अनेक नवीन अपडेट्स आले. आता मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) याही पुढे जाऊन एक नवा बदल करण्याच्या तयारीत आहेत. मार्क त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्य़ाची तयारी करत आहे. त्यामुळे आता फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही मेसेजेस पाठवता येणार आहेत.

या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत. त्यामुळे तुम्ही या तीनही नेटवर्कवरून एकमेकांना मेसेजेस पाठवू शकता. यामध्ये तुम्हाला इन्स्टाग्रामची खाते असण्याची आवश्यकता असणार नाही. म्हणजेच तुम्ही फेसबुक अथवा व्हॉट्सअ‍ॅपवरून इन्स्टावर मेसेज पाठवू शकता. 2019 च्या शेवटपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हेही वाचा : Your Time on Facebook फीचर ठेवणार तुमच्या फेसबुकवरील टाईमपासवर लक्ष !)

हे मेसेजेस पूर्णतः सुरक्षित राहण्यासाठी ही प्रक्रिया एंड टू एंड एनक्रिप्टेड असणार आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हीच प्रणाली वापरली जाते. याबाबत फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले, ‘आम्हाला युजर्ससाठी मेसेजिंगचा एक वेगळा अनुभव द्यायला आहे. सध्या लोकांना सर्व गोष्टी अतिशय जलद हव्या असतात, त्यामुळे ही नवी सुविधा लोकांचे जीवन अजून सोपे करेल.'