Forbes 2019 Highest Paid Athlete: मेस्सी अव्वल स्थानी, विराट कोहली 100 व्या क्रमांकावर; सेरेना विल्यम्स यादीत एकमेव महिला
Virat Kohli (Image: PTI/File)

भारताचा (india) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने पुन्हा एकदा फोर्ब्स (Forbes) च्या यादीत सर्वाधिक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. विराट फोर्ब्सच्या  यादीत पहिल्या १०० मधे स्थान मिळवणारा एकमेव क्रिकेटर आहे. जून २०१८ ते जून २०१९ पर्यंत विराटची कमाई ७ कोटींनी वाढून १७३ कोटींवर पोहचली आहे. तरीही, विराट मागच्या वर्षीच्या तुलनेत विराट ८३ व्या क्रमांकावरून १००व्या स्थानावर पोचला आहे. (Forbes Rich List 2019: फोर्ब्स श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी 13 व्या स्थानावर; संपत्तीत इतक्या कोटींची वाढ)

याच यादीत, अर्जेन्टिना (Argentina) चा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) ने अव्वल स्थान पटकावले आहे. पहिल्या स्थानासाठी मेस्सी ने पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) ला पछाडले आहे. मेस्सीची मागच्या वर्षाची कमाई 881.72 करोड इतकी होती तर रोनाल्डोने मागील वर्षी 756.35 करोड इतकी कमाई केली आहे. विराट आणि मेस्सीच्या कमाईची तुलना केली तर, मेस्सीची कमाई कोहलीच्या पाच पटीने जास्त आहे.

एकमेव महिला 

या यादीत धक्कादायक म्हणजे अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) हि एकमेव महिला खेळाडू आहे. सेरेनाने गेल्या वर्षी 202.5 करोड इतकी कमाई केली.