ICC Cricket World Cup 2019: 'वर्ल्डकप 2019 'च्या कोहली ब्रिगेड मध्ये महाराष्ट्रातील 'रोहित शर्मा' आणि 'केदार जाधव'चे स्थान पक्के
रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credits: PTI)

'आयपीएल'च्या मागोमाग येणाऱ्या आयसीसी विश्वचषक(ICC World Cup) सामन्यासाठी भारतीय संघाची बांधणी कशी असेल या कडे सर्वांचेच लक्ष लागून होते. पाच वर्षांतुन एकदा  होणाऱ्या या सामन्यासाठी यंदा नेमकी कोणाची निवड केली जाईल या संदर्भातील चर्चांना नुकताच पूर्णविराम लागला आहे. बीसीसीआयच्या निर्णयानुसार कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाची घोषणा झाली असून यात रोहित शर्मा ( Rohit Sharma), महेंद्र सिंग धोनी (M.S. Dhoni), शिखर धवन (Shikhar Dhwan), जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah), हार्दिक पंड्या (Hardik Pandya), केदार जाधव (Kedar Jadhav) या बहुचर्चित खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.  Team India ICC World Cup 2019 Announced: विश्व चषक खेळण्यासाठी भारतीय संघातील 15 खेळाडूंची नावे बीसीसीआय कडून घोषित.

येत्या 30 मे पासून इंग्लंड आणि वॉल्स येथे रंगणाऱ्या या विश्वचषक सामन्यासाठी 'कोहली ब्रिगेड' (Kohli Brigade)ला  सोशल नेटवर्किंग साइट्सवरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

भारतीय संघाच्या बांधणीत महत्वाचे स्थान प्राप्त केलेल्या रोहित शर्मा आणि केदार जाधव या दोन महाराष्ट्रातील खेळाडूंवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रोहित शर्माला संघात उप कर्णधार (Vice-Captain) या स्थानावर तर केदार जाधव याला सहाव्या क्रमांकावर नेमलेले आहे. या खेळाडूंची या पूर्वीची क्रिकेट क्षेत्रातील खेळी बघता ही महाराष्ट्रातील जोडगोळी प्रतिस्पर्ध्याच्या नाकी नऊ आणेल असा विश्वास दर्शवण्यात येत आहे.

यापूर्वी केवळ 190ओडीआय मॅचेसमध्ये 210 षटकार लावण्याचा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावी केला होता  तर केदार जाधवने देखील उत्तम कामगिरी करत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाकडून सर्वोत्तम, संयुक्त 14 वे स्थान पटकावले होते.

मराठमोळ्या केदार जाधवने मागील वर्षात अनेकदा वेगवेग्ळ्या शारीरिक दुखापतींवर मात करून सात ओडीआय (ODI) दरम्यान चार महत्वाच्या विकेट्स व दोन अर्ध शतके पूर्ण केली होती. या कामगिरीमुळे आणि संघातील सदस्यांच्या विश्वासामुळे येत्या मॅचेस मध्ये खेळण्याची संधी मिळणार असा विश्वास त्याने काही ट्विट्स मधून वर्तवला होता.

येत्या ३०मे पासून सुरूहोणारा विश्वचषक सामना 14 जुलै पर्यंत खेळलं जाणार आहे. या सामन्यांच्या पूर्वी भारत विरुद्ध न्यूझीलँड व भारत विरुद्ध बांगलादेश असा सराव सामना क्रमशः  25 व 28 मे ला खेळवण्यात येणार आहे.

विश्वचषक सामन्यातील भारताची पहिली मॅच 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध  साऊथम्पटन येथे रंगणार आहे