iPhone खरेदी करण्यासाठी बाथटबमधून घेऊन गेला चिल्लर
आयफोन खरेदीसाठी चिल्लर ( फोटो सौजन्य- इंस्टाग्राम )

जगप्रसिद्ध अमेरिकेच्या अॅपलच्या कंपनीने सध्या नवीन फिचर्स असलेले आयफोन बाजारात विकण्यास आणले आहेत. तसेच या आयफोनच्या सीरिजमध्ये iPhoneXS आणि iPhoneXS Max हे आतापर्यंतचे सर्वांत महागडे फोन असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आयफोन मोबाईलच्या चाहत्याने फोन घेण्यासाठी चक्क बाथटब मधून चिल्लर घेऊन गेला . तसेच बाथटबमधील चिल्लर मोजतानाचा एक व्हिजडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रुसमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला iPhoneXS - 256 GB हा आयफोन घ्यायचा होता. त्यासाठी त्याने घरातील बाथटबमध्ये 1,00,000 रशियन रुबल्स घेऊन दुकान गेला. तर भारतीय चलनानुसार याची किंमत 1,07,200 रुपये एवढी आहे. दुकानात बाथटबमधून चिल्लर घेऊन आलेल्या तरुणाला दुकानदाराने प्रथम पाहिल्याने तो चक्रावून गेला. मात्र त्यानंतर दुकानातील कर्मचाऱ्यांने या तरुणाने आणलेली चिल्लर मोजण्यास सुरुवात केली.

आयफोन खरेदी करण्यासाठी बाथटबमध्ये चिल्लर घेऊन दुकानात घेऊन आल्यामुळे आधी दुकानदार बुचकळ्यात पडला. मात्र त्याने या तरुणाकडील चिल्लर मोजण्यासाठी एका कर्मचाऱ्याची मदत घेतली. शेवटी सर्व चिल्लर मोजून झाल्यानंतर या तरुणाला आयफोन देण्यात आला. खर तर लोकांमध्ये आयफोन खरेदी करण्याची उत्सुकता पाहण्यास मिळते. परंतु तरुणाने आयफोनच्या खरेदीसाठी लढवलेली ही  शक्कल भारीच असल्याचेनदुकानदाराने सांगितले आहे.