चित्तथरारक व्हिडिओ: बिबट्याचा चार जणांवर हल्ला, नाशिक येथील सावरकरनगर धोका टळला तरीही भीतीच्या छायेत
Leopard Attacked People in Nashik | (Photo courtesy: ANI)

A leopard entered a residential area & attacked people in Nashik: नाशिक येथील सावरकर भागात बिबट्याने चार जणांवर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (25 जानेवारी) सकाळी हा भयावह प्रकार घडला. वन विभागाने अत्यंत थरारकपणे बिबट्याला जेरबंद केले असून, धोकाट टळला असला तरी, परिसरातील भीतीचे सावट मात्र अद्याप कमी झाले नाही. लोक अद्यापही या थरारनाट्याने गांगरून गेले आहेत. सावरकरनगर परिसरात बिबट्या शिरल्याची बातमी समजताच स्थानिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, गर्दी पाहून बिबट्या बिथरला आणि त्याने लोकांवर चाल केली.

प्राप्त माहितीनुसार, नाशिक मधील सावरकरनगर परिसरातील गंगापूर रोडवर बिबट्याने लोकवस्तीत प्रवेश केला होता. या प्रकाराची माहिती नागरिकांना समजताच बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. दरम्यान, घटनेची माहिती वन विभागालाही कळली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकार जाळे घेऊन तयार झाले. सावरकरनगर येथील एका बंगल्याबाहेर अधिकाऱ्यांनी जाळे लावले होते. (हेही वाचा, viral Video : औरंगाबादच्या खुलताबाद घाटात जेव्हा गाडी समोर बिबट्या आला)

वन विभागांच्या अधिकाऱ्यांचा अंदाज बरोबर निघाला. बिबट्या बरोबर या बंगल्याच्या गेटमधूनच बाहेर पडला. दरम्यान, अधिकारी बिबट्याला पकडणार इतक्यातच तो उपस्थितांवर चाल करुन आला. यात चार नागरिक जखमी झाले. व्हिडिओमध्ये बिबट्याने एका नागरिकावर केलेला हल्ला स्पष्ट दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यातून संबंधित व्यक्तीचा बचाव करण्यास प्रशासन आणि उपस्थितांना यश आले.