Shab e Barat 2019 Special Trains on WR: चर्चगेट-विरार मार्गावर 20 एप्रिलच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वे चालवणार 2 विशेष लोकल्स
Mumbai Local (photo credits: Commons.Wikimedia)

Shab e Barat 2019 Special Trains Time table: यंदा 20 एप्रिलच्या रात्री मुंबईसह देशभरात ‘शब ए बारात’ (Shab e Barat) ची रात्र साजरी होणार आहे. मुस्लिम बांधवांचा हा सण लक्षात घेता पश्चिम रेल्वेवर (Western Railway) 20-21 एप्रिलच्या मध्य रात्री दोन विशेष ट्रेन (Special Locals) चालवल्या जाणार  आहेत. चर्चगेट-विरार (Churchgate - Virar) आणि विरार-चर्चगेट (Virar - Churchgate)  या मार्गावर प्रत्येकी एक धीमी लोकल (Slow Local) चालवली जाणार आहे. Shab e Barat 2019 Date: मुस्लिम बांधवांसाठी 'शब-ए-बारात' ची रात्र का महत्त्वाची असते?

पश्चिम रेल्वेची विशेष सोय

अतिरिक्त प्रवासी गर्दीचं भान ठेवत पश्चिम रेल्वे चर्चगेट-विरार आणि विरार-चर्चगेट मार्गावर विशेष लोकल चालवणार आहे. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री चर्चगेट येथून पहिली विशेष लोकल मध्यरात्री 2.35 वाजता सुटेल ती लोकल विरारला 4.15 वाजता पोहचेल. दुसरी विशेष लोकल विरारहून 1.42 मिनिटांनी सुटेल आणि चर्चगेटला 3.22 वाजता पोहचेल. या दोन्ही लोकल धिम्या असल्याने चर्चगेट-विरार दरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

पश्चिम रेल्वे ट्विट

'शब-ए-बारात' ही मुस्लिम बांधवांसाठी खास असणार्‍या रात्रींपैकी एक रात्र आहे. या रात्री अल्लाहकडे प्रार्थना करून चूकांची माफी मागितली जाते. तसेच कब्रस्तानला भेट देऊन पूर्वजांना आदरांजली वाहिली जाते.