राज ठाकरे यांचा 19 मार्चला मुंबईत मेळावा, राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची घोषणा करणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येत्या 19 मार्च रोजी मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या वेळी राज ठाकरे मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. त्याचसोबत राष्ट्रवादीला (NCP) पाठिंबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विरोधात प्रचार करणार का असे ही प्रश्न आता उपस्थित राहत आहेत.

मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल जास्त काही बोलण्याचे टाळले होते. तर येत्या 19 ला राज ठाकरे मोठी घोषणा करत राष्ट्रवादीला पाठिंबा देणार असल्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.(हेही वाचा-राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाला साथ द्यायला नको - नितिन गडकरी)

तर या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल राज ठाकरे काय मत मांडतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. निवडणुक आयोगाने गेल्या रविवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र अद्याप राज ठाकरे यांनी कोणतीही भुमिका घेतली नसल्याचे दिसून येत आहे.