महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु; भाजप - शिवसेना युती सरकारकारला घेरण्यासठी विरोधकांची रणनिती पक्की
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ (Photo Credit : Youtube)

Maharashtra Monsoon Session 2019: महाराष्ट्र राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन आजपासून राजधानी मुंबई येथे आजपासून सुरु होत आहे. राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या सत्ताकाळातील हे शेवटचेच अधिवेशन आहे. कारण यानंतर थेट विधानसभा निवडणुकाच लागणार आहेत. त्यामुळे आपल्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांचा पाढा वाचत राज्य सरकार आपले प्रगती पुस्तक मांडण्याची शक्यत आहे. तर, विविध विधेयके पास करत जनतेलाही दिलासा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या कारभारात राहिलेल्या त्रुटींवर विरोधक कसा प्रहार करतात हा देखील या अधिवेशनातील उत्सुकतेचा विषय असणार आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. तसेच, अधिवेशनासाठी आपण सज्ज आहोत असे सांगतानाच हे सरकार अभासी विकास दाखवत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सरकार नव्हे तर, विरोधकच अभासी झाले आहेत. त्यांची जनतेशी नाळ तुटली आहे. त्यामुळेच ते असा आरोप करत असल्याचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तरादाखल दिलेल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दुष्काळ, शेतकरी कर्जमाफी, पाणीटंचाई, मंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचारांचे आरोप आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेली क्लिन चिट हे मुद्दे विरोधक सरकारला धारेवर धरण्यासाठी आक्रमकपणे मांडण्याची शक्यता आहे. दरम्यन, अधिवेशनानंतर काही काळातच विधासभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांनी आपली प्रतिमा मलीन होऊन नये. तसेच, अडचणीत आणणारे विषय फारसे चर्चेत येऊ नयेत असा सरकारचा प्रयत्न राहिल. तर, काहीही करुन सरकारला अडचणीत आणायचेच आसा विरोधकांचा प्रयत्न राहणार आहे. (हेही वाचा, 17 जूनपासून मुंबईत राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु; 12 दिवस चालणार कामकाज, 18 जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर)

दरम्यान, विरोधी पक्षनेते राहिलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यमान सरकारमध्ये घेतलेली मंत्रिपदाची शपथ हा देखील विरोधकांच्या टीकेचा विषय राहणार आहे. यासोबतच विविध मंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचाराच्या आरोपावरुनही विरोधक रान उठविण्याची शक्यता आहे.