महाराष्ट्र लोकसभा निकाल 2019 विजेयी उमेदवारअहमदनगर - सुजय विखेअकोला - संजय धोतरेअमरावती - नवनीत राणाऔरंगाबाद - इम्तियाज जलीलबारामती - सुप्रिया सुळेबीड - प्रीतम मुंडेभंडारा गोंदिया - सुनील मेंढेभिवंडी - कपिल पाटीलबुलढाणा - प्रतापराव जाधवचंद्रपूर - सुरेश धानोरकरधुळे - सुभाष भामरेदिंडोरी - भारती पवारगडचिरोली - अशोक नेतेहातकंगणे - धैर्यशील मानेहिंगोली - हेमंत पाटीलजळगाव - उमेश पाटीलजालना - रावसाहेब दानवेकल्याण - श्रीकांत शिंदेकोल्हापूर - संजय महाडिकलातूर - सुधाकर शृंगारेमाढा - रणजीतसिंह निंबाळकरमावळ - श्रीरंग बारणेमुंबई साऊथ - अरविंद सावंतमुंबई नॉर्थ - गोपाल शेट्टीमुंबई नॉर्थ सेंट्रल - पूनम महाजनमुंबई नॉर्थ ईस्ट - मनोज कोटकमुंबई नॉर्थ वेस्ट - गजानन कीर्तिकरमुंबई साऊथ सेन्ट्रल - राहुल शेवाळेनागपूर - नितीन गडकरीनांदेड - प्रतापराव चिखलीकरनंदुरबार - हिना गावीतनाशिक - हेमंत गोडसेउस्मानाबाद - पवनराजे निंबाळकरपालघर - राजेंद्र गावितपरभणी - संजय जाधवपुणे - गिरीश बापटरायगड - सुनील तटकरेरामटेक - कृपाल तुमाणेरत्नागिरी - विनायक राऊतरावेर - रक्षा खडसेसांगली - संजय पाटीलसातारा - श्रीमंत  छत्रपती उदयनराजेशिर्डी - सदाशिव लोखंडेशिरूर - अमोल कोल्हेसोलापूर - जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींठाणे - राजन विचारेवर्धा - रामदास तडसयवतमाळ - भावना गवळी

मराठीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

पराभव मी खुल्या दिलाने स्वीकारतो, असे अशोक चव्हाण म्हणाले. तसंच त्यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाता जोमाने विधानसभेच्या तयारीला लागा, असे आवाहन केले आहे.

'लाव रे ते फटाके' म्हणत उद्धव ठाकरे यांनी विजयावर प्रतिक्रीया दिली. तर मातोश्रीवर दाखल झालेल्या फडणवीस, आठवले यांनीही आपले मत मांडले. आठवले यांनी खास कविताही सादर केली. 

महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीला लोकसभा निवडणूकीत दिलेल्या प्रतिसादाबद्दल भाजपने ट्विट करुन आभार मानले आहेत.

शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांचा विजय.

शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचा पराभव करत साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले विजयी झाले.

यंदाचा लोकशाहीचा निकाल हा अनाकलनीय अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. 

तरी देखील राज ठाकरे अजून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या दमदार विजयानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे आणि रामदास आठवले 'मातोश्री'कडे रवाना झाले आहेत.

स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांचा पराभव करुन शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी ठरले आहेत.

Load More

देशात गेल्या महिन्याभरापासून लोकसभा निवडणूकांची (Loksabha Elections 2019) धामधूम होती. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान पार पडले. 19 मे रोजी एक्झिट पोलचे कल हाती आल्यानंतर आज निवडणूकांच्या निकालाची देशभरात उत्सुकता आहे. 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर जनतेचा कल हळूहळू हाती येऊ लागतील. एक्झिट पोलनुसार, देशात एनडीएला (NDA) सत्ता मिळू शकते असे चित्र समोर आले. त्यामुळे देशात पुन्हा मोदी सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र एक्झिट पोलचे हे अंदाज कितपत खरे ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

देशात पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, चौथ्या टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघ, पाचव्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि सातव्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात मतदान झाले. (लोकसभा निवडणुक 2019 चे Live निकाल कंप्युटर आणि मोबाईलवर 'या' पद्धतीने पाहा)

तर महाराष्ट्रात 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल या चार दिवसात चार टप्प्यातील मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 19 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघात तर चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रात चार टप्प्यात मिळून एकूण 60.67% मतदान झाले आहे.