Lok Sabha Elections 2019: आघाडीचं ठरलं, युतीचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस मिशन ट्वेंटी-20, शिवसेना-भाजप गुलदस्त्यात
Congress-NCP | | (Archived and representative images)

Lok Sabha Elections 2019: आगामी लोकसभा काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि मित्रपक्ष यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युलाही पक्का झाला. तसेच, लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांसाठी एकमतही झाले आहे. आता केवळ उर्वरीत 8 जागांचा विषय बाकी आहे. या जागांवरही यशस्वी तोडगा काढला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिली आहे. त्यामुळे आता आघाडीचं तर ठरलं. पण, युतींच काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस मिशन ट्वेंटी-20

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. लोकसभेच्या आगामी निवडणूका दोन्ही पक्ष 'मिशन ट्वेंटी-20' फॉर्म्युला वापरत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यासाठी 48 पैकी 40 जागांची बोलणी झाली आहेत. तर, उर्वरीत आठ जांगाचा निर्णय लवकरच होणार आहे. दरम्यान, या निवडणुकांमध्ये आंबेडकरी विचारांच्या पक्षांनाही सोबत घ्यावी अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्याबाबतचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरुन केले आहे.दरम्यन, पक्षाध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी एक बैठकही पार पडली. (हेही वाचा, डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश: महत्त्वाची कारणे)

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवतील. त्यासाठीच आम्ही समविचारी पक्षांसोबत युती करत आहोत, असेही पटेल यांनी म्हटले आहे.