दाते समितीच्या शिफारशी बंजारा समाजाला लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार: मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (Photo Credit : Facebook, Devendra Fadnavis)

बंजारा समाज शूर आहे. या समाजाला नक्कीच काही अडचणी आहेत. त्या सोडविण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. तसेच, दाते समिती अहवालातील शिफारशी बंजारा समजाला लागू करण्यासाठीही सरकार प्रयत्न करणार, असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजास दिली. ते वाशिम जिल्ह्यातील विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात पोहरागड येथे येथे बोलत होते. हा कार्यक्रम सेवालाल महाराज मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. या वेळी आपल्या भाषणाची सुरुवात बंजारी भाषेत करुन त्यांनी स्थानिक भाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपिठावर उपस्थित होते. तसेच, राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते.

या वेळी त्यांनी बंजारा समाजाचे कौतुक केले. ते म्हणाले, बंजारा समाज शूर आहे. सेवालाल महाराज या समाजाचे दैवत आहे. सेवालाल महाराजांनी समाजाला दिशा, उर्जा आणि प्रेरणा दिली. स्वातंत्र्याचा पुरस्कार करत ब्रिटींशांविरोधात पहिला एल्गार सेवालाला महारजांनी पुकारला. सेवालाल महाराजांचे देशासाठी मोठं योगदान आहे. म्हणूनच सेवालाल महाराजांच जागतिक किर्तीचं स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी उर्वरीत १०० कोटींचा निधी लवकरच देऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

वर्धा यवतमाळ रेल्वेमार्गावर पोहरागड स्टेशनची निर्मिती केली जाईल.

बंजारा संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार बंजारा अॅकेडमी सुरु करणार.

बंजारा समाजाला बोली भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शब्द टाकणार

सेवालाल महाराजांची जयंती शासकीय पद्धतीने साजरी होणार.

(हेही वाचा, मुख्यमंत्रीसाहेब ...! तर,राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही - शिवसेना)

सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी नियम, कायद्यांचा अडसर नाही

सेवालाला माहाराजांनी कसे लढावे हे शिकावले. त्यांची शिकवण चिरंतन काळासाठी मार्गदर्शक राहील. अशा थोर व्यक्तिमत्वाचे भव्य स्मारक उभारले जायला हवे. हे स्मारक उभे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाठीशी भक्कमपणे ठाम आहे. खरे तर महाराष्ट्र सरकारने २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाची स्मारके उभा करायची नाहीत, असे ठरवले होते. पण, सेवलाल महाराष्ट्राचे कार्य पाहात सर्व नियम, कायदे बाजूला ठेऊन सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी वाट्टेल तितका निधी खर्च झाला तरी, त्यासाठी आम्ही मंजूरी देऊ. सेवालाल महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले.