IRCTC Special Tourist Train: भारत दर्शन - केवळ 9,900 रुपयांत फिरा देशभर, IRCTC ची पर्यटकांसाठी स्पेशल ऑफर
Representational Image | Indian Railways (Photo Credits: PTI)

IRCTC Bharat Darshan Special Tourist Train 2019 : तुम्हाला पर्यटन करायची आवड आहे किंवा तुम्ही 'भारत दर्शन' करु इच्छित आहात तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (Indian Railway Catering and Tourism Corporation) अर्थातच IRCTC तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक स्पेशल ऑफर. ही ऑफर IRCTC 'भारत दर्शन' उपक्रमांतर्गत राबवत आहे. थेटच सांगायचं तर भारत दर्शन अंतर्गत एक स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. ज्या ट्रेनमध्ये केवळ 9,900 रुपयांत 'भारत दर्शन' घडवले जाईल. महत्त्वाचं म्हणजे या ट्रेनमध्ये पर्यटक प्रवाशांना सकाळचा नाश्ता, दुपार आणि रात्रीचं जेवण मिळेल. या उपक्रमात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचाही समावेश असणार आहे.

कसं असेल IRCTC Bharat Darshan?

  • स्पेशल ट्रेन दहा दिवसांत तीन राज्यांतील पर्टन क्षेत्रांना भेट देईल.
  • प्रवासाचा कालावधी हा 12 ते 22 ऑगस्ट असा राहील.
  • भारत दर्शन झारखंडमधील येथील जसीडीहपासून यात्रेस प्रारंभ.
  • महाराष्ट्रात शिर्डी, त्रंबकेश्वर तर, द्वारका, सोमनाथ, उज्जेन आणि ओमकारेश्वर येथेही पोहोचणार स्पेशल ट्रेन.
  • पर्यटक प्रवाशांना असन्सोल, पुरूलीया, टाटानगर आणि झारसुगुडामधून प्रवास सुरु करता येणार.

(हेही वाचा, Google Maps चे नवे फिचर; आता कळणार बस, ट्रेनचे लाईव्ह रनिंग स्टेटस)

दरम्यान, IRCTC भारत दर्शन स्पेशल ट्रेन प्रवास १२ ऑगस्ट पासून सुरु होईल. EZBD31 क्रमांकाची ही ट्रेन असल्याची माहिती आहे. ही गाडी जसीडीह येथून सकाळी 9.30 मिनिटांनी आपला प्रवास सुरु करेन. या गाडीचा प्रवास 11 दिवस आणि दहा रात्री असा असेन. तिकीट दर 9,900 रुपये. या पैशामध्येच प्रवाशांना तीन वेळा शाकाहारी जेवण, नाश्ता आदींचा समावेश आहे. या पैशात प्रवाशांना रेल्वेचं स्लीपर क्लासतिकीट आणि राहण्यासाठी नॉन एसी रूमची सेवाही उपलब्ध आहे. ज्या प्रवाशांना या या ट्रेनमधून भारत दर्शनावर निघायचे आहे ते प्रवाशी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर आपलं तिकीट बूक करु शकतात.