मानसिक संतुलनासाठी Instagram चा मानवी आरोग्याला धोका?
इंन्स्टाग्राम ( फोटो सौजन्य - फेसबुक )

आजची तरुण मंडळी सध्या जास्तवेळ सोशल मीडियावर व्यस्त असताना दिसून येतात. इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा वापर ही दर सेकंदाला वाढत चालला आहे.तसेच कोणती ही गोष्ट करण्यापूर्वी फोटो क्लिक करण्याची सवय सध्या तरुण मंडळींमध्ये जास्त प्रमाणात दिसून  येत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का? इन्स्टाग्राम (Instagram) मानसिक संतुलनासाठी धोकादायक ठरले असल्याचे एका अभ्यासक्रमातून खुलासा करण्यात आला आहे.

-अभ्यासक्रमातून खुलासा

रॉल एल सोसायटीफॉर पब्लिक अॅण्ड यंग हेल्थ मूव्हमेंट यांनी केलेल्या अभ्यासातून, इन्स्टाग्राम मानसिक संतुलनासाठी हानिकारक असल्याचे समोर आले आहे. तर स्नॅपचॅट हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- तरुणांवर केले सर्वेक्षण

युके मध्ये राहणाऱ्या 1,5000 कमी वयाच्या तरुण मंडळींवर याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. कमी वयोगटातील मुले जास्त करुन सोशल मीडियाचा जास्त वेळ उपयोग करत असल्याचे समोर आले आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, युट्युब आणि ट्वीटर युजर्सची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे झोपेचा अभाव, मानसित तणाव, फिअर ऑफ मिसिंग आऊट आणि आपल्या लूकवर कोणता परिणाम होतो यापद्धतीचे प्रश्न या सर्वेक्षणामध्ये विचारले गेले होते.

- इन्स्टग्राम सर्वात धोकादायक

इन्स्टाग्रामबाबत सकारात्मक आणि नकारत्मक प्रश्नांच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. तर सोशल मीडियावरील इतर अॅपपेक्षा इन्स्टाग्राम सर्वात धोकादायक असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. तर इन्स्टाग्रामुळे महिला किंवा तरुण मंडळींना त्यांच्या दिसण्याबाबत खूप तक्रार असल्याचे दिसून येते. परंतु इन्स्टाग्रामवरील काही फोटोंचे फोटोशॉपच्या माध्यमातून त्याचा चेहरामोहरा बदलेला असतो.

- फोटोशूट सर्वात खतरनाक

परफेक्ट दिसण्यासाठी सध्या तरुण मंडळींमध्ये चढाओढ सुरु आहे.याचा परिणाम मानसिक संतुलनावर दिवसागणिक पडत आहे. तसेच फोटो काढल्यानंतर तो आपण व्यवस्थित दिसण्यापर्यंतच्या क्रियेत खूप वेळ सध्याची तरुण मंडळी घालवत असतात.