70th Republic Day of India: Doodle च्या माध्यमातून Google ने साजरा केला भारताचा प्रजासत्ताक दिन
Google Doodle

आज 26 जानेवारी. भारताचा 70 वा प्रसाजसत्ताक दिन(Republic Day). देशभरात भारतीय नागरिक आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. जगभरातही अनेक भारतीय हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. दरम्यान, इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल (Google) भारतीय प्रजासत्ताक काहीसा अनोख्या डंगात साजरा करताना पाहायला मिळत आहे. गुगले डूडल (Google) बनवून भारतीय प्रजासत्ताकाचा सन्मान केले आहे. जगातील सर्वात मोठे प्रजासत्ताक असलेल्या या देशाच्या विविधतेत एकतेला गुगलनेही ' India's Republic Day' या शिर्षकाखाली डूडलच्या माध्यमातून प्रणाम केला आहे.

भारत हा जगातील एक असा देश आहे. ज्या देशात प्रतिदिन काही ना काही सण, उत्सव सुरु असतोच. भन्न धर्म, जाती, समूह, पंथ अशा विविधतेत एकता माणणाऱ्या या देशात प्रत्येकजण आपला सण आपापल्या पद्धतिने उत्साहाने साजरा करतो. मात्र, प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्या दिन हे दोन राष्ट्रीय सण असे आहेत की, ज्यात भारतातील अबालवृद्ध सर्व जाती-धर्म विसरुन एकत्र येतात. हा सण साजरा करतात. 26 जानेवारी या दिवसाचे भारतीय नागरिकांच्या दृष्टीने आणि संसदिय प्रणालीत एक वेगळे महत्त्व आहे. कारण 70 वर्षांपूर्वी म्हणजेच 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतामध्ये संविधान लागू झाले. जे आज भारतीय लोकशाही प्रणालीचे अभिन्न अंग आहे. संविधानाच्या आधारावरच भारताच्या लोकशाहीचा डोलारा उभा आहे. भारतीय संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देतात. आणि त्याच्या स्वातंत्र्यावरही शिक्कामोर्तब करतात.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राजधानी दिल्लीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील राजपथावर विशेष संचलन (Republic Day Parade) आयोजित करण्यात आले आहे. या संचलनामध्ये भारतीय हवाई दल, भूदल आणि नौदल आपल्या सामर्थ्य आणि कसरतींचे प्रदर्शन करतील. विशेष म्हणजे आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा (Cyril Ramaphosa) उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा, Happy Republic Day 2019 Wishes: भारताच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Stickers, SMS, Facebook Status, Messengers च्या माध्यमातून देण्यासाठी खास मराठी ग्रिटींग्स)

दरम्यान, 70 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Presiddent Ramnath Kovind) यांनी राष्ट्राला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, देश सध्या एका विशेष टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. 21व्या शतकात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार करायला हवे. तसेच, लोकशाही मुल्ये आणि प्रतिष्ठा सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घ्यायला हवी.