Rail Budget 2019: अंतरिम बजेटमधून रेल्वेला काय मिळालं?
Indian Railway (Photo Credit: PTI)

Rail Budget 2019: अर्थमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या अर्थसंकल्प सादरीकरणानंतर सर्वत्र सकारात्मक प्रतिक्रीया येत आहेत. 5 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करण्यात आलं. शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधी देण्याची घोषणा करण्यात आली. महिलांसाठी खास सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर निवडणूकीच्या पार्श्वभूमिकवर अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. (मोदी सरकारच्या रेल्वे बजेटमध्ये काय असेल खास?)

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याचबरोबर अलिकडच्या काळात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प पियुष गोयल यांनी सादर केला. यापूर्वी सामान्य बजेटच्या एक दिवस आधी रेल्वे बजेट सादर होत असे. मात्र गेल्या 92 वर्षांची परंपरा मोडीत काढत मोदी सरकारने गेल्या वर्षीपासून रेल्वे आणि सामान्य बजेट एकत्र सादर करण्यास सुरुवात केली. जाणून घेऊया मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाने रेल्वेला काय दिले....

# रेल्वेसाठी यंदा अर्थसंकल्पात 64 हजार 587 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

# रेल्वे प्रवाशांसाठी 'वन्दे मातरम्' ही नवीन एक्स्प्रेस सुरु करण्यात येणार आहे. या ट्रेनने जागतिक दर्जाचा प्रवास आरामदायी होईल, असा दावा गोयल यांनी केला.

# देशात एकही रेल्वे फाटक मानवरहित राहिले नसल्याचा दावाही यावेळी गोयल यांनी केला.

# रेल्वे तिकीट दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

या सर्व सुविधांसोबतच यंदाचे आर्थिक वर्ष रेल्वेसाठी सुरक्षित ठरल्याचंही पियुष गोयल यांनी सांगितलं.