Pubg Addiction: पबजी गेम खेळण्याच्या नादात तरुण अॅसीड प्यायला; प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु
Pubg Addiction | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Pubg Addiction: स्मार्टफोन किंवा संगणक, लॅपटॉप आदींच्या माध्यमातून पबजी गेम ( Pubg Game)खेळणाऱ्यांचे प्रमाण प्रंचड मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक तरुण, तरुणी पबजी गेमच्या इतके आहारी गेले आहेत की अनेकांनी स्वत:वरील नियंत्रणही गमावले आहे. उत्तर प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील छिंदवाडा (Chhindwara) येथे अशीच घटना घडली. या घटनेत पबजी गेम खेळण्याच्या नादात एका युवकाने पाण्याऐवजी चक्क अॅसीड (Acid) प्यायले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, छिंदवाडा येते एक युवक पबजी गेम खेळत होता. खेळता खेळता त्याला तहान लागली. त्याच्या आजूबाजूला त्याला एक पाण्याची बॉटली दिसली. ती बॉटल पाण्याची होती. मात्र, त्यात पाणी नव्हते तर, अॅसीड होते. या तरुणाचे संपूर्ण लक्ष्य हे पबजी गेम खेळण्याकडे होते. परिणामी त्याने गेम खेळण्याच्या नादात बाटलीचे झाकण उघडले आणि ती बॉटल थेट तोंडाला लावली. या घटनेत बॉटलमधील अॅसीडमुळे तरुणाच्या तोंडाचा बराचसा भाग जळाला. वेदनेमुळे तडफडणाऱ्या तरुणाचा आरडाओडा ऐकूण तरुन आजूबाजूच्या लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या तरुणावर उपचार करणाऱ्या डॉ. मानन गोगीया (Dr. Manan Gogia performed an operation on the youth's the intestin) यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अॅसीड थेट तोंडात गेल्यामळे तरुणाच्या आतड्यापर्यंत पोहोचले आहे. तरुणाच्या आतड्यांचा बराचसा भाग अॅसीडमुळे जळाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तरी, चिंताजनक आहे. (हेही वाचा, धक्कादायक! PUBG खेळण्याच्या नादामुळे प्रेग्नेंट पत्नीला सोडले)

दरम्यान, या गेमवर बंदी घालावी अशी जोरदार मागणी सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून सरकारडे होत आहे. अनेक पालकांनी आपल्या स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉप आदींना डिजिटल लॉकही लावले आहेत. जेणेकरुन मुलांनी या गेमच्या आहारी जाऊ नये. असे असले तरी अनेक तरुण हे पबजी गेमच्या आहारी गेल्याचे वास्तव आहे.