मतदार यादीमधून देशातील तब्बल 2 कोटी 10 लाख महिलांची नावे अदृश्य
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आगमी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. तसेच राजकीय पक्षात सुद्धा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 2 कोटी 10 लाख महिलांची नावे मतदार यादीमधून  गायब झाल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील महिलांची नावे मतदार यादीमधून गायब झाल्याचे सांगितले जात आहे. तर पत्रकार प्रणव रॉय आणि दोराब, सोपारीवाला यांच्या द व्हर्डिक्ट: डिकोडिंग इंडियाज इलेक्शन या पुस्तकातून ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे यंदाच्या मतदार यादीमधील महिलांची नावे कमी झाल्याने तब्बल कोटीच्या घरात मदतार वर्ग असल्याचे दिसून येत आहे.(हेही वाचा-लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मतदार म्हणून नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी यांचं राहुल गांधी, शरद पवार यांच्या पासून सलमान खान पर्यंत अनेक मान्यवरांना 'खास आवाहन')

तर आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथे महिला मतदारांची नावे गायब झाल्याचे प्रमाण कमी आहे. तसेच उत्तर प्रदेशात मतदारसंघातील महिला मतदारांचे प्रमाण 80 हजार असल्याचे सांगितले जात आहे.