भारतानं पाडलं पाकिस्तानंच एफ-16 विमान, पॅरेशूटच्या माध्यमातून पाकचे पायलट पळाले
File photo for representation only

भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करुन पाकिस्तानी हद्दीत पळ काढणारे पाकिस्तीनी लष्कराचे विमान भारताने पाडल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या हद्दीत हे विमान एफ-16 या प्रकारातील असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या विमानाच्या रुपात भारतीय लष्कराने भारतीय लष्कराने पुन्हा एकदा पाकिस्तानचे नाक ठेचले आहे.

प्राप्त माहितीनुसार पाकिस्तानी लष्कराचे एफ-16 प्रकारातील हे विमान भारतीय हवाई हद्दीत 3 किलोमीटर आत आले होते. भारतीय हवाई हद्दीतून पाकिस्तानमध्ये परत जात असतान हे विमान पाकिस्तानच्या हद्दीतच पडले. विमान पडताना लोकांनी प्रत्यक्ष पाहिले. तसेच, त्यातून पॅरेशूटच्या माध्यमातून काही लोकांना विमानातून बाहेर पडतानाही नागरिकांनी पाहिल्याचे वृत्त आहे.  (हेही वाचा, भारतीय लष्कराची सतर्कता पाहून पाकिस्तानी विमानांनी काढला पळ)

दरम्यान, पाकिस्तानच्या पडलेल्या एफ-16 या विमानातील पायलट गंभीर जखमी झाला असल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याची प्रकृती नेमकी कोणत्या स्थिती आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, भारतीय लष्कर किंवा भारत सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

महत्त्वाची टीप: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित केलेले वृत्त लेटेस्टलीकडे प्राप्त झालेल्या माहितीवर आधारीत आहे. कोणत्याही निष्कर्षावर पोहचण्यापूर्वी किंवा सोशल मीडियावर संदेश प्रसारित करण्यापूर्वी वाचकांनी भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी अशी विनंती.