नोंटबंदी हा आर्थिक धक्का, त्यामुळे विकासदर मंदावला; अरविंद सुब्रमण्यन यांचा नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर कटाक्ष
नोटबंदी: अरविंद सुब्रमण्यन, पंतप्रधानांचे माजी सल्लागार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Archived, edited, images)

Former CEA Arvind Subramanian On Demonetisation: नोटबंदी (Demonetisation) हा एक मोठा आर्धिक धक्का होता. ज्यामुळे विकासदर (GDP) 8 टक्क्यांवरून पुढच्या सात महिन्यांमध्ये थेट 6.8 टक्क्यांवर आला. हे विधान विरोधी पक्षांतील नेत्यांनी नव्हे तर अरविंद सुब्रमण्यन (Former CEA Arvind Subramanian) यांनी केले आहे. अरविंद सुब्रमण्यन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे माजी सल्लागार आहेत. 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली. मोदींच्या या निर्णयावर तेव्हा प्रचंड टीका झाली. आजही होते. अरविंद सुब्रमण्यन यांनी नोटबंदीवर त्या वेळी होत असलेल्य टीकेबाबत मौन बाळगले होते. हे मौन सोडत सुब्रमण्यन यांनी नोटबंदीवर भाष्य केले आहे.

सुब्रमण्यन यांनी पंतप्रधानांचा सल्लागार म्हणून चार वर्षे कार्यकाळ पूर्ण केल्यावर या वर्षाच्या सुरवातीस पदाचा राजीनामा दिला. सुब्रमण्यन यांचे एक पुस्तक बाजारात येऊ घातले आहे. या पूस्तकांत त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मात्र, नोटबंदीचा निर्णय घेताना सरकारने त्यांचा सल्ला घेतला होता किंवा नाही याबाबत मात्र पुस्तकात भाष्य केले नसल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

'ऑफ काऊन्सल: द चॅलेंजेज ऑफ द मोदी-जेटीली इकॉनमी' (Of Counsel: The Challenges of the Modi-Jaitley Economy) असे या पुस्तकाचे नाव असून ते पेंग्वीन प्रकाशनाकडून प्रकाशित केले जात आहे. या पुस्ताकात सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे की, 'नोटबंदीच्या निर्णयाने एकाच फटक्यात 86 टक्के चलन व्यवहारातून बाद झाले. नोटबंदीचा प्रचंड मोठा परिणाम जीडीपीवर झाला. जीडीपी आगोदरपासूनच घटत होता. पण, नोटबंदीनंतर ही घसरण अधिक वेगाने झाली. ' (हेही वाचा, नोटबंदी: अरुण जेटली यांना वाटते, 'काळाची गरज'; मनमोहन सिंह म्हणतात, 'काळासोबत खोलवर रुतणारी जखम')

सुब्रमण्यन यांनी पुस्तकात 'नोटबंदीची दोन परिणाम आर्थिक आणि राजकीय'(The Two Puzzles of Demonetisation Political and Economic) या प्रकरणात म्हटले आहे की, नोटबंदीपूर्वीच्या सहा तिमाहीमध्ये विकासदर (जीडीपी) 8 टक्के होता. नोटबंदीनंतर पुढच्या सात तिमाहींमध्ये हाच विकासदर 6.8 टक्क्यांवर पोहोचला. नोटबंदीमुळे विकासदर घटला याबाबत कोणालाही संशय नसावा असे सुब्रमण्यन यांना वाटते.