Bulandshahr Violence: बजरंग दल, विहिंप, भाजयुमो कार्यकर्त्यांसह 87 जणांवर FIR
बुलंदशह हिंसाचार प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करणार आहे. (Archived, edited, symbolic images)

Bulandshahr Violence: बुलंदशहर (Bulandshahr) येथील सियाना परिसरात घडलेल्या कथीत गोहत्येवरुन भडकलेल्या हिंसाचारात एसएचओ सुबोधकुमार सिंग (Subodh Kumar Singh) यांच्यासह दोण जणाचा बळी गेला. या प्रकरणात पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. मेरठ झोनचे एडीजी प्रशांत कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम (एसआयटी)कडे सोपविण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतरही जमाव हिंसक का झाला याचा तपास एसआयटी (SIT) प्रामुख्याने करणार आहे. तसेच, पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार यांना एकट्याला सोडून इतर पोलीस कर्मचारी का पळाले याचाही तपास एसआयटी करेन.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दोन FIR दाखल केले आहेत. त्यातील एक गोहत्या करणाऱ्या आरोपींविरोधात आहे. तर, दुसरा FIR हिंसा करणाऱ्या जमाव आणि आरोपींविरोधात आहे. प्राप्त माहितीनुसार, दुसऱ्या एफआय आरमध्ये ८७ जणांना आरोपी करण्यात आले आहे. यात २७ जणांच्या नावांचा समावेश आहे. तर, उर्वरीत ६० अज्ञात लोक आहेत. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार एसएचओच्या हत्या प्रकरणात हिंदुत्त्ववादी संघटनांचे नाव पुढे येत आहे. प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. ( अखलाक हत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सुबोध सिंग यांची जमावाकडून हत्या)

सियाना हिंसा प्रकरणात महत्त्वपूर्ण वृत्त असे की, FIRमध्ये ज्या लोकांची नावे आहेत त्यातील काही आरोपी हे बजरंग दल (Bajrang Dal), भाजप युवा मोर्चा (BJP Yuva Morcha) आणि विश्व हिंदू परिषदेचे (VHP) कार्यकर्ते असल्याचे समजते. हिंसा भडकवल्याप्रकरणी योगेश राज आणि सत्यंद्र राजपूत यांना प्रमुख आरोपी बनविण्यात आले आहे. योगेश हा बजरंग दलाचा जिल्हा संयोजक असल्याचे सांगितले जात आहे. सर्व आरोपी हे सियानाचेच रहिवासी आहेत. तर दुसरा आरपी शिखर अग्रवाल हा भाजप युवा मोर्चाचा नगराध्यक्ष आहे. तर, उपेंद्र राघव हा विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. चमन आणि देवेंद्र नावाच्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.(हेही वाचा, हिंदू-मुस्लिम वादात माझ्या वडिलांना जीव गमवावा लागला; सुबोध सिंग यांच्या मुलाचा संताप)

दरम्यान, जमावाच्या हिंसाचारात शहीद झालेले पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार यांच्या पार्थीवाला पोलीस लाईन येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी एसएसपी, डीएम यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर शहीद इन्स्पेक्टर सुबोधकुमार यांचे पार्थीव त्यांच्या जन्मगावी पाठविण्यात आले. दरम्यान, सुबोध कुमार यांच्या पार्थीवाला योग्य तो सन्मान देण्यात आला नाही. त्यांचे शरीर तिरंग्यात लपेटण्यात आले नसल्याच आरोप कुटुंबीयांनी केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी केला आहे. दरम्यान, कुटुंबीयांची तक्रार समजताच पोलीस अधिकाऱ्यांनी सुबोध कुमार यांच्या पार्थिवास तिरंग्यात लपेटून अंतिम निरोप दिल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.