स्वाईन फ्लू: भाजप अध्यक्ष अमित शाह रुग्णालयात दाखल; पक्षकार्यात मोठा अडथळा
Amit Shah | (Photo courtesy: amitshah.co.in)

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह (BJP Chief Amit Shah) यांना स्वाईन फ्लू (Swine Flu) झाल्याने रुग्णालायत दाखल झाले आहेत. अमित शाह यांनी स्वत:च ट्विटरद्वारे आपल्याला झालेल्या आजाराची माहिती दिली आहे. त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमित शाह यांच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून पक्षकार्यात अडथळा निर्माण झाला आहे. येत्या काही काळात अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने देशभारत विविध कार्यक्रम हाती घेतले होते. मात्र या सर्वच कार्यक्रमांना ब्रेक लगण्याची चिन्हे आहेत.

भाजपचे निवडणूक जिंकून देणारे चाणक्य अशी अमित शाह यांची ओळक बनली आहे. खास करुन 2014मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मिळालेला दणदणीत विजय ही ओळख अधिक दृढ होण्यास कारणीभूत ठरला. 2014 नंतर देशात झालेल्या विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांपासून ते अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ते पालिका अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये भाजपला उत्तम यश मिळाले. यातील विधानसभा निवडणुका वगळता इतर सर्वच निवडणुकांमध्ये अमित शाह यांचा थेट सहभाग नसला तरी त्यांचे आदेश, निवडणूक व्यवस्थापण आणि बूथ लेवलपर्यंत काम करण्याची पद्धत कार्यकर्त्यांसाठी मह्त्तवाची ठरली आहे.

दरम्यान, अमित शाह पक्षाध्यक्ष झाल्यापासून भाजपसाठी राजकीयदृष्ट्या अच्छे दिन आले असे म्हटले जाते. भाजपच्या इतिसाहात पहिल्यांदाच पक्षाला इतके मोठे यश मिळाले. असे असले तरी, अमित शाह यांच्यावर टीकाही मोठ्या प्रमाणावर होत असते. भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या सर्व अध्यक्षांपैकी एककल्ली आणि हुकुमशाही पद्धतीने पक्षकारभार करणारा अध्यक्ष, अशा आशयाचा आरोपही त्यांच्यावर त्यांचे विरोधक करतात. तसेच, देशात खळबळ माजवून टाकणाऱ्या अनेक वादग्रस्त गुन्हे आणि प्रकरणांत त्यांचे नाव असल्यानेही ते अनेकदा चर्चेत असतात. त्यातील काही गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्यांची निर्दोश मुक्तताही केली आहे. स्वाईन फ्लूमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने भाजपला काही काळ अडचणींचा सामना करावा लागणार हे नक्की. (हेही वाचा, महाराष्ट्रात यंदा स्वाईन फ्लूचे 302 बळी, स्वाईन फ्लूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको)

दरम्यान, अमित शाह यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त येताच भाजपतील अनेक नेत्यांनी ट्विटरद्वारे त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच काँग्रेसनेही ते लवकर बरे व्हावेत असे म्हटले आहे.