खुशखबर! बँकिंग क्षेत्रात तब्बल 7 हजार पेक्षा जास्त पदांची भरती; जाणून घ्या महत्वाच्या तारखा आणि  कुठे कराल अर्ज
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, (IBPS)च्या रिजनल रूरल बँक, आरआरबी मध्ये जवळजवळ 12 हजार पदांची भरती होणार आहे आयबीपीएस आरआरबीच्या लेटेस्ट नोटिफिकेशननुसार ग्रामीण बँकांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि कार्यालय सहाय्यक पदांवर भरती होणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करु इच्छितात त्यांनी 18 जून 2019 पर्यंत आयबीपीएसची अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.  या जॉबसाठी दोन परीक्षा आणि इंटरव्ह्यू असे राउंड होणार आहेत.

अशी आहे पदसंख्या - 

  • ऑफिस सहायक - 7,373 पदे
  • ऑफिसर स्केल 1 - 4,856,
  • अधिकारी स्केल 2 – 1,746
  • अधिकारी स्केल 3 – 207 पदे

कार्यालय सहाय्यक आणि अधिकारी स्केल 1 ची आयबीपीएस आरआरबी 2019 प्री परीक्षा या वर्षी ऑगस्ट महिन्यात आयोजित केली आहे. ऑफिसर स्केल 2 व 3 ची आयबीपीएस आरआरबी 2019 प्री परीक्षा 22 सप्टेंबर 2019 रोजी होणार आहे. प्री परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना नंतर आयबीपीएस आरआरबी मुख्य परीक्षा 2019 मध्ये बसणे आवश्यक आहे. आयबीपीएस आरआरबी 2019 ची मुख्य परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. ऑफिस सहाय्यक पदांच्या भरतीसाठी मुलाखत घेण्यात येणार नाही.

वय -

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी आयु सीमा निश्चित केली आहे. ज्यात किमान वय 18 वर्षे आहे आणि जास्तीत जास्त वय 40 वर्षे आहे.

योग्यता -

या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेकडून पदवी, बी.ई./बी.टेक, एलएलबी, सीए, एमबीए पदवी प्राप्त केलेली असावी. (हेही वाचा: नोकरी पाहात आहात? शिक्षण फक्त ग्रॅज्युएट हवे, मिळणार 44,990 रुपये पगाराची नोकरी)

पे-स्केल -

उमेदवारांची पे-स्केल 7200 - 19300/-, 14500 - 25700/-, 19400 - 28100/-, 25700 - 31500/- असे निश्चित करण्यात आले आहे.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाइन नोंदणी - 18 जून ते 4 जुलै
  • फी भरणे तारीख: 18 जून ते 4 जुलै
  • आयबीपीएस आरआरबी प्री परीक्षा - 3 ऑगस्ट, 4 आणि 11 (कार्यालय स्केल 1), 17 ऑगस्ट 18 आणि 25 (कार्यालय सहाय्यक)
  • आयबीपीएस आरआरबी मुख्य परीक्षा - कार्यालय सहाय्यक (29 सप्टेंबर), ऑफिस स्केल 1 (22 सप्टेंबर)
  • आयबीपीएस आरआरबी सिंगल परीक्षा - ऑफिस स्केल 2 आणि 3 (22 सप्टेंबर)
  • आयबीपीएस आरआरबी इंटरव्ह्यू - ऑफिस स्केल 1, 2 आणि 3 (नोव्हेंबर)