मुंबई: आझाद मैदान येथे मेडीकलच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन कायम, सरकारी आश्वासन केवळ अद्याप तरी कागदावरच
Maratha Reservation | (Photo credits: File Photo)

राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदान (Azad Maidan) येथ आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द करण्याच्या दिलेल्या निर्णयाने 250 वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले. त्यामुळे या मद्द्यावर तोडगा काढावा. यासाठी हे विद्यार्थी आक्रमक आहेत. यावर प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आश्वासन सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिले. मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आझाद मैदानातून मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतल्याने तिढा कायम राहिला आहे. तसेच, याबाबतचे नोटीफेशन लवकरच जारी करु असेही सराकरकढून सांगण्यात आले. मात्र, या प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास अवघ्या काही तासांचाच कालावधी शिल्लख असतानाही सरकारकडून कोणत्याही प्रकारचे नोटीफिकेशन प्राप्त झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

 कलम 17.1 नुसार राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार 

मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांबाबत सरकार निर्णय घेऊ शकते. मात्र, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही, असे सर्वोच्च न्यायालायाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. ही पार्श्वभूमी विचारात घेता आरक्षणाच्या आदेशातील कलम 17.1 नुसार राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, असे दिसते.

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

या आधिकाराचा विचार करुन सरकारने प्रक्रिया सुरु केली आहे. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाढण्यासाठी ज्येष्ठ वकीलांची फौज कामाला लावली आहे. दोन ते तीन दिवसांत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. तसेच आरक्षण रद्द केल्याने धोक्यात आलेल्या 250 विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची शेवटची मुदत मंगळवारी संपत असल्याने त्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता लक्षात घेत प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात येईल व त्यासंदर्भातील नोटीस एका तासांत काढण्यात येईल, तसे आदेश सीईटी सेलला दिल्याचेही त्यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र विद्यार्थी या आदेशाबाबतच्या नोटीशीची अद्यापही वाट पाहात आहेत. आतापर्यंत तरी सरकारची आवश्य असलेली कुठलीच नोटीस अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाली नसल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

सरकारला खरोखरच नोटीस पाठवायचे आही की नाही?

आझाद मैदानातून प्रसारमाध्यमांशी बोलताना आंदोलक विद्यार्थ्यांन आक्रमक भूमिका व्यक्त केली. तसेच, सरकारवर टीकाही केली. राजकीय नेते मंडळी विद्यार्थ्यांची भेट घेत आहेत. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाड देण्यासा निर्णय सरकारने घेतली. मात्र, अद्यापपर्यंत तिढा काही सुटला नाही. राज्य सरकार शेवटपर्यंत निर्णय अंधारात ठेवते. आदल्या दिवशी सरकार सांगते की तुम्हाला नोटीफिकेशन जाहीर करु. प्रत्यक्षात मात्र दुसरा दिवस उजाडून वेळ टळून गेली तरीही सरकार नोटीफिकेशन जारी करत नाही. विद्यार्थी सरकारच्या नोटीसची वाट पाहात आहेत. सरकारला खरोखरच नोटीस पाठवायचे आही की नाही?, असाही शंकास्पद सवाल काही विद्यार्थी आंदोलक व्यक्त करत आहेत. (हेही वाचा, CTET 2019 - Reservation Issue: आरक्षण प्रवेशासाठी, पात्रता परिक्षेसाठी नव्हे: सर्वोच्च न्यायालय)

काही तासच विद्यार्थ्यांच्या हाती

दरम्यान, काही आंदोलक विद्यार्थी भावना व्यक्त करत आहेत की, गेली आठ दिवस मेडिलकलचे विद्यार्थी सरकारी नोटीसची वाट पाहात आहेत. खरे तर आम्ही आता या क्षणी रुग्णाची सेवा करत हॉस्पिटलमध्ये असायला हवे होतो. मात्र, सरकारने आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आणली आहे. आमच्याकडे आता केवळ तीनच तास बाकी आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकियेबाबतच्या नोटीस संकेतस्थळावर येत असतात. जेणकरुन मेडीकल प्रवेश परीक्षेबाबत नोटीस पाठवले जाते.