डोळा मारल्याचा व्हिडिओ पाहून दिग्दर्शकही प्रिया वारियार हिच्या प्रेमात, चित्रपटात दिली प्रमुख भूमिका
Priya Warriar l (Photo Credits: Instagram)

कुणाचं नशीब कधी पालटेल याचा नेम नाही. पूर्वी लोक यश मिळविण्यासाठी राब राब राबायचे. यश मिळवायचं तर कष्ट कोणाला चुकलंय. परंतू, आता काळ बदलला अंगमेहनतीपेक्षा बुद्धीचातुर्याच्या जोरावर स्मार्ट वर्क करण्याचा जमाना आला. पण, काहींच नशीब इतकं बलवत्तर की काहीही विशेष कष्ट न घेता केवळ ही मंडळी रातोरात स्टार होता. यश, पैसा, प्रसिद्धी त्यांच्या चरणी लीन होते. एका व्हिडिओमुळे रातोरात स्टार बनलेली आणि अल्पावधीतच 'नॅशनल क्रश' (National Crush) म्हणून ओळखली जाऊ लागलेली स्टार प्रिया वारियर (Priya Warriar) हिच्याबाबत असेच म्हणता येईल. ‘ओरु अदार लव्ह’ (Oru Adaar Love) चित्रपटाचे दिग्दर्शक ओमर लुलू (Director Omar Lulu) यांनी नुकताच याबाबत एक खुलासा केला. जो वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

ओमर लुलू सांगतात सुरुवातीला प्रिया वारियर हिचा मुख्य भूमिकेसाठी कधीच विचार करण्यात आला नव्हता. चित्रपटात ती केवळ एक सहाय्यक अभिनेत्री होती. तिचा डोळामारतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओही त्याच भूमिकेतील आहे. मात्र, डोळा मारतानाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि रातोरात ती वलयांकीत चेहरा बनली. तिच्याबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता वाटू लागली. तिची प्रसिद्धी पाहून मी निर्मात्याकडे गेलो आणि प्रिया वारियार हिलाच मुख्य भूमिकेत प्रेक्षकांसमोर आणूया असे मी त्यांना म्हणालो. चित्रपट अधिक उत्तम व्हावा या हेतूने मी ही भूमिका मांडली होती. निर्मात्यांनाही ही कल्पना आवडली. त्यांनी प्रिया वारियर हिला मुख्य भूमिकेत ठेऊन चित्रपट पून्ही चित्रित करण्याचे फर्मान सोडले. प्रियासाठी चित्रपटाची कथाही बदलण्यात आली. (हेही पाहा, कारभारीsss दमानं... सेवानिवृत्त नायब तहसीलदारांचा नर्तिकेसोबत नृत्याचा तडका; व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, ‘ओरु अदार लव्ह’ या चित्रपटात आगोदर मुख्य अभिनेत्रीची भूमिका नूरिन शरीफ ही साकारणार होती. मात्र, निर्मात्यांनी ऐनवेळी आपला निर्णय बदलला आणि तिच्या भूमिकेत बदल करुन ती महत्त्व कमी करण्यात आले. खरे तर नूरिन ही प्रियापेक्षा चांगली अभिनेत्री आहे. पण, आम्ही त्या वेळी निर्णय बदलून प्रियाला मुख्य भूमिका दिली, असे दिग्दर्शकांनी म्हटले आहे. दरम्यान, निर्माते आणि दिग्दर्शकांनी भूमिकेत केलेल्या बदलामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत अभिनेत्री नूरिन शरीफ हिने आपल्या भावना तेव्हा व्यक्त केला होत्या.