‘टॉयलेट : एक प्रेम कथा’,‘पॅडमॅन’चित्रपटांची निर्माती प्रेरणा अरोरा हिला फसवणुक प्रकरणात अटक
Producer Prerna Arora (Photo courtesy: archived, edited, representative image)

चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा (Film Producer Prerna Arora) हिला आर्थिक गुन्हे प्रतिबंधक शाखेने (Economic Offences Wing)अटक केली आहे. प्रेरणावर तब्बल 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ‘क्रिअर्ज एंटरटेन्मेंट’ निर्मिती संस्थांच्या माध्यमातून तिने आतापर्यंत काही चित्रपट बनवले आहेत. त्यापैकी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’(Toilet: Ek Prem Katha), ‘पॅडमॅन’(padman) या चित्रपटांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला होता. तसेच, समिक्षकांनीही या चित्रपटांना गौरवले होते. अनेक पुरस्कारही या चित्रपटाला प्राप्त झाले आहेत.

पद्मा फिल्मशी संबंधीत अनिल गुप्ता यांनी प्रेरणा हिच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. काही महिन्यांपूर्वी (सप्टेंबर) प्रेरणाच्या क्रिअर्ज एंटरटेन्मेंटविरोधात एक एफआयआरही दाखल झाला होता. मात्र, तेव्हा प्रेरणाने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान, सध्याचा बहुचर्चीत 'केदारनाथ' या चित्रपटाचीही निर्मिती प्रेरणा करणार होती. मात्र, या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक कपूर यानेही प्रेरणावर पैसे थकविल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रेरणाने 'केदारनाथ'च्या निर्मितीतून काढता पाय घेतला. (हेही वाचा, तरुणीशी लैंगिक गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी गायक Mika Singh ला Dubai मध्ये अटक)

प्रेरणा अरोरा हे व्यक्तिमत्व गेल्या काही काळापासून बरेच वादग्रस्त राहिले आहे. प्रेरणाच्या क्रिअर्ज एंटरटेन्मेंटविरोधात जॉन अब्राहमच्या जेए एंटरटेन्मेंटनंही कायदेशीर नोटीस बजावली आहे. एका मसाज करणाऱ्या महिलेनेही प्रेरणा अरोरा हिच्यावर पैसे थकवल्याच आरोप केला होता. तसेच, प्रेरणाने आपल्यावर हात उगारत शिवगाळ केल्याचेही या महिलेने म्हटले होते. दरम्यान, एकापेक्षा अधिक पासपोर्ट आणि पॅनकार्ड बाळगल्याप्रकरणी प्रेरणाला यापूर्वीही अटक झाली होती.