Bigg Boss Marathi 2, Episode 2 Highlights: बिग बॉस मराठी सिझन 2 च्या पहिल्या एपिसोडमध्ये घरातील सर्व सदस्यांनी अभिजित यांच्यावर कसे तोंडसुख घेतले हे आपण पहिले. सोबतच घरात सध्या नॉमिनेशन प्रक्रिया चालू आहे. सर्व सदस्यांच्या मते निवडलेल्या नावांपैकी शिव हा या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट झाला आहे. अभिजित आणि वैशाली यांच्या लखोट्यात लीडर 1 आणि लीडर 2 असे लिहिले असते. तर मैथिली घरात राहण्यास पात्र ठरली आहे.
दुसऱ्या दिवशी रात्री, सर्वजण गार्डन एरियामध्ये गाणी म्हणत असताना, अचानक शिवानी इमोशनल होते. पहिल्याच दिवसाच्या शेवटी घरच्यांची आठवण येत असल्याने तिच्या अश्रूंचा बांध फुटतो. इकडे सुरेखा ताई आपल्या नृत्याने सर्वांचे मनोरंजन करतात. त्यानंतर अभिजित आणि वैशाली दोघेही लीडर या नात्याने आपापली टीम निवडतात. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरात अशाच टीम्स कार्यरत राहणार आहेत.
दुसऱ्या दिवशी दोन्ही अभिजितमध्ये टीम्समधील सदस्यांबद्दल चर्चा होते. बोलताना अभिजित बिचुकले यांच्या तोंडातून रुपाली बद्दल ‘ठोकायचे’ असा शब्द बाहेर पडतो. यावरून शिवानी आणि अभिजित केळकर बिचुकले यांनी शब्द जपून वापरावे असे सांगतात. शिवानी तिच्या स्ववानुसार बाहेर जाऊन ही गोष्ट सर्वांना सांगते, आणि परत सर्वजण बिचुकले यांच्यावर तुटून पडतात. दरम्यान शिवानी बिचुकले किती खोटारडे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करते. हळू हळू यात सर्व सदस्य सामील होऊन शाब्दिक चकमक वाढत जाते.
बिचुकले यांच्या टीममधून 2 सदस्यांना नॉमिनेट प्रक्रियेपासून सुरक्षित करण्यास बिग बॉस सांगतात. त्यानुसार सर्वजण एकमेकांशी चर्चा करीत असता, बिचुकले शिवानीला एकांतात आपला पुname="q" placeholder="Search" aria-label="Search" required>